Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांगलवाडी – मुडझा – व्याहाड रस्त्याचा निधी गेला कुठे?माजी आम. प्रा. अतुल देशकर यांचाआमदार वडेट्टीवारांना सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील ब्रम्हपुरी – सावली तालुक्याला जोडणारा गांगलवाडी – व्याहाड या मुख्य रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे. हा रस्ता तयार व्हावा यासाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी अनेक वेळा मागणी केली. परंतु रस्ता जैसेथेच आहे. आमदार वडेट्टीवार यांनी अनेकवेळा भूलथापा देत ह्या रस्त्याबाबत नागरिकांची दिशाभूल केली. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने भाजपा नेते प्रा. अतुल देशकर यांचा नेतृवात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या क्षेत्राचे आमदार व राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी २०१७ साली या रस्त्यासाठी ९२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला सांगून सावली तालुक्यातील व्याहाड येथे या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. तशा प्रकारची माहिती सुद्धा वडेट्टीवार यांनी वर्तमान पत्रात दिली. परंतु रस्त्याचे काम काही झाले नाही. त्यानंतर २०१९ मधे विधानसभा निवडणुकी नंतर हळदा येथील आयोजित कार्यक्रमांमध्ये सदर रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे आमदार वडेट्टीवार जाहीर केले. परंतु त्यानंतर सुद्धा रस्त्याच्या निर्मितीचे काम काही झाले नाही. या वर्षी लोकसभा निवडणुकी पूर्वी महाशिवरात्री च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांचा चांगला खरपूस समाचार घेतला. या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार यांनी सदर रस्त्यावरील सर्व गावांमध्ये ६०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे स्वतःच्या फोटो व नावाचे बॅनर बोर्ड लावत जाहीर केले. या नंतर लोकसभा निवडणूक आटोपून महिने लोटून गेले तरी रस्त्याचे काम झाले नाही. या नंतर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आमदार वडेट्टीवार यांनी १,००० कोटी खर्च करुन काम सुरु असल्याचे सांगितले. आज पर्यंत एकूण २,८८० कोटी रुपये मंजूर झाल्याचे आमदार वडेट्टीवार यांनी सांगितले तसे भूमिपूजन ही त्यांनी केले तरी रस्त्याचे काम काही सुरु झाले नाही. काम झाले नाही तर हा हजारो कोटी रुपयांचा निधी गेला कुठे असा सवाल आता भाजपने केला आहे.

या रस्त्याच्या कामांमध्ये आमदार वडेट्टीवार यांनी मोठा घोटाळा केला असून मंजूर झालेला निधी स्वतःच्या घशात घातल्याचा आरोप भाजप नेते प्रा. देशकर यांनी केला आहे. या विषयाला धरून भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ३५३-ड वरील रस्त्यावरील गांगलवाडी – आरमोरी टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो च्या संख्येने नागरिक सहभागी झाले. “वडेट्टीवार हटाव, ब्रम्हपुरी क्षेत्र बचाव “ च्या घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलना प्रसंगी महिला मोर्चाला माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या सह महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, तालुका महामंत्री तथा माजी पं. स सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, तालुकाध्यक्ष अरुण शेंडे, विनायक पाकमोडे, बरडकिन्हीचे नकटू बनसोड यांनी मार्गदर्शन केले.

१.५ की.मी पर्यंत गाड्यांच्या रांगा

राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास हून अधिक भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी चक्काजाम केल्याने. आरोमारी – गांगलवाडी टी पॉइंट येथील तिन्ही रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या. १.५ हून अधिक दूर पर्यंत गाड्यांच्या रांगा बघायला मिळाल्या.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे भाजपा नेते तथा माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये