Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता म.गांधीजी तसेच लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे २ ऑक्टोंबरला राष्ट्रपिता म. गांधी तसेच देशाचे दूसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, प्रा. प्रशांत खैरे, प्रा. अनिल मेहरकुरे, प्रा. प्रविण उफाडे होते. सर्वप्रथम गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अध्यक्ष तथा प्रमुख अतिथींनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी म. गांधी व शास्त्रीजी यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी तर आभार प्रा. कु. सोज्वल ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळा, कनिष्ठ महाविदयालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये