ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाहीचे बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात

नवीन प्रवासी बसस्थानकच्या शोधात ; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – चंद्रपुर-नागपुर महामार्गावरील सिंदेवाही बस स्थानक अतिक्रमणने गिळकृत केले असुन थेट रस्त्यावर दुकाने आल्याने मोठ्या अपघाताना निमंत्रण दिले जात आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजुने ठराविक अंतर हे सुरक्षेसाठी सोडलेले असते परंतु मात्र सर्रास डांबरी रोडवर अतिक्रमणे आली असुन यामुळे याठिकाणी वहाने दुकानात घुसुन मोठे अपघात झाले आहेत. सिंदेवाही बस स्थानक चौकात तर चारही बाजुनी अतिक्रमणे वाढतच चालली नवीन प्रवाशांना बसस्थानक शोधत बसावे लागते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ व संबंधित विभागांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
सिंदेवाही बस स्थानक चौकात काही नागरीक आपली वहाने थेट रस्त्यावर आडवी लावुन ठेवत असतात.त्यामुळे रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तथा अपंग बांधवांना सदर रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागानी जातीने याकडे लक्ष घालून हे अतिक्रमन काढावे अशी,जेष्ठ नागरीक,अंपग व सुजान नागरिकांची मागणी आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये