GamesSportsक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

अंडरवाटर स्विमिंग स्पर्धेत स्वचेत कंदिकुरवार राज्यातून कांस्य पदक पटकवून ठरला तिसरा

नैनिताल येथील राष्ट्रीय फिनस्वीमिंग चॅम्पियनशिप साठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. चिमूर

अंडरवाटर स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने नुकतीच घेण्यात आलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य फिनस्वीमिंग चॅम्पियनशिप २०२३ च्या स्पर्धेत राज्याच्या जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला असता स्वचेत चेतन कंदीकुरवार चंद्रपूर याने कांस्य पदक पटकवून तिसरा क्रमांकाचा खेळाडू ठरला असून त्याची नैनिताल येथे होणाऱ्या दि २४ जून च्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली.

अंडरवाटर स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने फिनस्वीमिंग चॅम्पियन शिप २०२३ ची स्पर्धा श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे दि११ जून ला घेण्यात आली होती. राज्यातील १२ ते १३वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्वचेत कंदिकुरवार चंद्रपूर याने
५०मी,१००मी व २०० मी च्या स्विमिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत तिसऱ्या क्रमांक वर येऊन त्याने कांस्य पदक पटकाविला.

राज्यातून तिसऱ्या क्रमांक वर येऊन कांस्य पदक घेत स्वचेत ची राष्ट्रीय फिनस्वीमिंग चॅम्पियनशिप २०२३ च्या दि २४ ते २६ जून दरम्यान उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातील इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियम गौलापार हळदवानी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.

चिमूर येथील रमेश कंचर्लावार (सेवानिवृत्त बँक ऑफ महाराष्ट्र ) व नप च्या माजी विरोधी गट नेत्या छायाताई कंचर्लावार यांचा स्वचेत चेतन कंदीकुरवार हा नातू आहे.

स्वचेत ने यशाचे श्रेय चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलावाचे प्रशिक्षक महेंद्र कपूर व सहकारी कर्मचारी यांनी दिले.

यशासाठी प्रेरणा स्थान म्हणून वडील चेतन व आई स्वेता कंदीकुरवार यांना दिले.

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सुद्धा स्वचेत ला प्रोत्साहित करून यशाच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये