Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर

कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुका काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार मा. श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर म्हणाल्या की, मला आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच मी प्रचंड बहुमताने निवडून आले. आपल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. अर्थातच माझ्या अभूतपूर्व विजयात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. ते खंबीर माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळेच मला हे यश मिळाले त्यामुळे अशा अनुभवी, विकासशील, स्पष्टवक्त्या आणि आपल्या क्षेत्रातील जनतेच्या हितासाठी कायम संघर्ष करणाऱ्या झुंजार नेतृत्वाच्या सोबत आपण सर्वांनी तितक्याच ताकदीने उभे राहून पून्हा संधी देत त्यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवू या असे आवाहन केले. तर आ. सुभाष धोटे यांनी बाळूभाऊ धानोरकर यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि खा. श्रीमती प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यशैलीचा, परिश्रमाचा आवर्जून उल्लेख करीत त्या आणि आपण सदैव जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

        यावेळी कोरपना तालुक्यातील विविध गावातील भारतीय जनता पक्ष, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. खा. प्रतिभाताई धानोरकर आणि आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जेवरा भाजपचे जिवदास आत्राम, मांडवा शेतकरी संघटनेचे सेवा सह. सोसायटीचे संचालक तुकाराम आत्राम, विमलताई आत्राम, विठ्ठल कुमरे, कवठाळा भाजपचे शांताराम मडावी, लोणी भाजपचे ग्रा प. सदस्य कुणाल कुडमेथे, शंकर मामीडवार, गणेश काकळे, शेरज शे. संघटनेचे मोहन उराडे, अंतरगाव भाजपचे नामदेव कुमरे, नानाजी उलमाले, शे. संघटनेचे देविदास माणुसमारे, पालगाव शे. संघटनेचे ग्रा. प. सदस्य रवीचंद कुंभारे यासह भाजप, शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

        यावेळी कोरपना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सभापती श्रीधरराव गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, विठ्ठलराव थिपे, काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश पा. मालेकर, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी संचालक भाऊजी चव्हाण, महिला अध्यक्षा आशाताई खासरे, माजी जि. प. सदस्य विनाताई मालेकर, मीना गेडाम, वहाब भाई, रसूल पटेल, गणेश गोडे, विक्रम येरणे, प्रा. आशिष देरकर, दिपक खेकारे, शैलेश लोखंडे, रोशन आस्वले, रोशन मरापे, प्रशांत लोढे यासह कोरपना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने महिला, शेतकरी, शेतमजूर, युवक नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये