Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर करार हे विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ॲड. वामनराव चटप 

चंद्रपूर येथे विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी

चांदा ब्लास्ट

      नागपूर करारा द्वारे दिनांक २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मात्र या सत्तर वर्षात या कराराद्वारे देण्यात आलेली आश्वासने पाळली नाही. यामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या. याचा निषेध करण्यासाठी आणि आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी चंद्रपूर शहरातील जेटपूरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दिनांक २८ सप्टेंबर २०२४ दुपारी १ वाजता विदर्भ कराराची होळी करून आणि जोरदार घोषणा देऊन आपला संताप व्यक्त करीत निषेध केला.

        चंद्रपूर येथील या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, जिल्हा सचिव अंकुश वाघमारे, कपील इद्दे, मुन्ना आवळे, किशोर दांडेकर, पुंडलिक गाठे, शेषराव बोंडे, ईश्वर सहारे, सरपंंच पांडूरंग पोटे, मारुती बोथले, गोपी मित्रा, किशोर दांडेकर, प्रभाकर ढवस, जाधव, बंडू देठे, कोमल रामटेके, अरूण सातपूते, शेख ईस्माईल, प्रभाकर लडके, मारोती उरकुडे, महादेव बोरेकर, विलास कुदीरपाल, आक्केवार सर, मारुती बोथले, राज पाटील, मधुकर चिंचोलकर, बबन रणदिवे यांचेसह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.

       विदर्भ नैसर्गिक दृष्ट्या संपन्न क्षेत्र असूनही गेल्या सत्तर वर्षात विदर्भावर सतत अन्याय झाला आहे. विदर्भातील प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळेच येथे शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, सिंचन अनुशेष, नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. याशिवाय आता आमचे लोकसभा व विधानसभा येथील प्रतिनिधित्व कमी झाले. त्यामुळे २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार झाला असल्याने त्याच दिवशी आज २८ सप्टेंबर ला या विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक असलेल्या विदर्भ कराराची आज चंद्रपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात नागपूर कराराची होळी करण्यात आली.

           – ॲड. वामनराव चटप,माजी आमदार तथा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंंदोलन समिती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये