ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदुर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2025/26 साठी प्रवेशित बी एस सी भाग 1 च्या विद्यार्थ्याचे स्वागत द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.

27 सप्टेंबरला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्यक्रांतिकारक शहीद भगत सिंग यांची जयंती व भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची पुण्यतिथी होती.यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धनंजय गोरे, सचिव, गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. पवन चतारे, डॉ. संदीप घोडिले व डॉ. मनोहर बंदरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहीद भगत सिंह यांच्या जीवन कार्यावर व डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

त्याचबरोबर वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना विविध बाबतीत आपले अनुभव सांगून पुढील आयुष्यकरिता मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. नेहा भोयर तर आभार प्रदर्शन कु. पायल आगलावे या विद्यार्थिनीने केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये