ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एनडीएलआय व एनलिस्ट इनफ्लीबनेट कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भा.शि.प्र.मं.सावली द्वारा संचालित रा.म. गांधी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ एस.आर. रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.चंद्रमौली हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.त्यानी एनडीएलआय व एनलिस्ट यांवर सखोल असे मार्गदर्शन केले तसेच कार्यशाळेचे रिसोर्स पर्सन म्हणून प्रा संदिप देशमुख यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

एनडीएलआय व एनलिस्ट हे दोन आँनलाईन डेटाबेसेस असून या डेटाबेसेस घ्या माध्यमाने जागतिक स्तरावरील शासनाने सुरू करण्यात आलेले आँनलाईन ग्रंथालय सेवा असून आपण कुठेही बसून इंटरनेट च्या माध्यमाने ग्रंथ प्राप्त करू शकतो. हे एक असे केंद्र आहे की यामध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत आवश्यक असलेले ग्रंथ आडीओ व्हिडिओ लेक्चर्स, हस्तलिखित, पिएचडीचे थेसीस तसेच इतरही शैक्षणिक साहित्य याद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रास्ताविकेतून प्रा दिलीप सोनटक्के यांनी यावर सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी एनडीएलआय क्लबचे अध्यक्ष डॉ प्रेरणा मोडक, प्रा प्रशांत वासाडे, प्रा संगानंद बागडे,डॉ.दिवाकर उराडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये