ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात लावलेले दुचाकी पळवली

गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या यार्डात उभी केलेली दुचाकी अज्ञान चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक 28 रोजी घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की सिंदखेड राजा तालुक्यातील वसंत नगर येथील शेतकरी गजानन छगन राठोड हे काही कामानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आले होते त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक MH 28 बी यु 23 34 स्प्लेंडर किंमत 35 हजार रुपये दिनांक 26 ला अज्ञात चोरट्याने लंपास केली.

फिर्यादी यांनी दोन दिवस गाडीची शोधा शोध केली परंतु ती मिळून आली नाही शेवटी त्यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार दिली याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये