Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्थतज्ञ प्रा. डॉ. नरेश बोडखे महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गोखले अर्थशास्त्र संस्था पुणे येथे कार्यरत असलेले सिंदखेड राजा तालुक्यांतील रहिवासी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक असून नेते पक्षश्रेष्ठी शरद पवार, रोहित पवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे प्रा.डॉ. नरेश बोडखे यांनी आज देऊळगाव राजा येथील विश्राम गृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

अर्थशास्त्र चे गाढे अभ्यासक डॉ बोडखे यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ च्या तुलनेत सिंदखेड राजा मतदार संघ विकासात खूपच मागे असल्याचे सांगून या मतदार संघात विकासाचे व्हिजन आपण तयार केले असुन ते प्रत्यक्षात करून दाखविण्यास आपण कटिबध्द असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रावर अगोदरच ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना लाडकी बहीण योजना मध्ये ४६ हजार कोटी रुपये गुंतऊन विकासाला खीळ बसवली असून या रकमेत राज्यातील शेत रस्ते तयार झाले असते,ही योजना निव्वळ राजकीय हेतूने सुरू केली असून जास्त काळ सुरू राहणार नाही असे सांगितले

आपण स्वतःसर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असुन शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या माहीत आहे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये