Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मृतिप्रित्यर्थचा खर्च टाळून 50 बेंच शाळेसाठी दिले भेट

स्तुत्य उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 1 देऊळगाव राजा येथे धुळे परिवाराकडून 50 बेंच भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभआयोजित करण्यात आला होता.

स्व. सखारामजी धुळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या मुलांकडून डॉ. किशोर धुळे (आयुक्त इन्कम टॅक्स विभाग मुंबई ), श्री सागर धुळे, श्री ईश्वर धुळे, श्री दत्तात्रय धुळे यांच्याकडून शाळेसाठी / मुलांना बसण्यासाठी 50 बेंचेस दातृत्व भावनेने भेट म्हणून दिले , त्यानिमित्ताने शाळेकडून त्यांच्या मातोश्री व परिवाराचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले . या कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ प्रामुख्याने हजर होते तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीमती भालेराव ताई व उपाध्यक्ष श्री. गुरव सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पिंगळे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गाडगे सर यांनी केले त्यामध्ये समाज सहभागातून शाळा किती विकसित होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाबळेवाडी शाळेचे उदा देऊन समाज सहभागासाठी साद घातली त्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आपलें अध्यक्षीय मनोगत मांडले त्यामध्ये साहेबांनी शाळेसाठी सर्वात मोठी अडचण शाळेच्या इमारतीचा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तर शेवटी आभारप्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राजमाने मॅडम यांनी केले.

त्याचबरोबर नवनियुक्त व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ भालेराव मॅडम उपाध्यक्ष श्री गुरव सर व सर्व नवनियुक्त सदस्य यांचाही मुख्याधिकारी श्री मोकळ साहेब यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व शिक्षक वृंद,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये