Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंपनीने दोन दिवसांत निर्णय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल : यास्मिन सैय्यद 

लॉयड्स मेटल्स कंपनीत 35% महिलांना रोजगार मिळावा या मागणीसाठी आंदोलन

चांदा ब्लास्ट

 घुग्घुस (चंद्रपूर) : दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी महिला क्रांती संघटनेच्या यास्मिन सैय्यद व सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुस शहरात लॉयड्स मेटल्स कंपनीच्या विस्ताराअंतर्गत नवीन उद्योगात 35% रोजगार महिलांना मिळावा अशी शहरातील महिलांनी आंदोलन केले. या आंदोलनाची रॅली पोलीस ठाण्यासमोरून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत नेण्यात आली. त्यांनी एचआर मॅनेजर रमेश राधाराम, तरुण केशवानी आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांशी 1 तास सखोल चर्चा करून निवेदन सादर केले. आणि कंपनीने 2 दिवसात तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे उपस्थित महिलांकडून सांगण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 घुग्घुस शहरात महिलांना रोजगार उपलब्ध नाहीत दहा ते बारा तास काम केल्यानंतर त्यांना केवळ तीन हजार ते पाच हजार रुपयेच पगार मिळतो विधवा परित्यकता व कुटुंबाची जवाबदारी असलेल्या अनेक सुशिक्षित व होतकरू मुली व महिला शहरात आहेत ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहेत. शहरात गेल्या तीस वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या लॉयड्स मेटल्स कंपनीच्या प्रदूषणच खायचा का? असा संतप्त प्रश्न ही महिला उपस्थित केले. महिलांची भागीदारी ही पुरुषांच्या बरोबरीची असतांना महिलांनी केवळ शहरातील दुकानात अथवा हॉटेल मध्येच तीन चार हजार रुपयासाठी भांडेच धुवायचे काय?

 महिलांना कंपनीत कंपनीत रोजगार देण्यात यावा कंपनीने शहरात मोफत स्वयंरोजगाराचे शिकवणी केंद्र व व्यवसाय उपलब्ध करून द्यावे गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना मुला मुलींना मोफत शालेय साहित्य, लॅपटॉप व सायकील वितरण करण्यात यावे तसेच लता नलभोगा या महिलेचा कंपनी गेट समोरील दुकान अतिक्रमनात हटविण्यात आले या महिलेला दहा लाख रुपयांचा मोबदला देण्यात यावे अश्या अनेक मागण्यायांना घेऊन प्रथमच महिलांनी महिलासाठी आंदोलन उभारल्याचे चित्र दिसत आहे.

 सध्या लॉयड्स मेटल कंपनीचे एचआर मॅनेजर रमेश राधाराम, तरुण केशवानी, सुरक्षा इन्चार्ज पटानीया, पोलिस प्रशासनाचे एपीआय अतुल कुल, कुफिया इन्चार्ज सुहास विधाते, माजी विधानसभा अध्यक्ष हजर हुसेन शेख उर्फ अज्जू, यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान खान, मयूर कलवल, आम आदमी पक्षाचे अमित बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) दिलीप विठ्ठलवार, बीएसपी पक्षाचे सिद्धार्थ कोंडागुर्ला, युवक काँग्रेसचे युवा नेते निखिल पुनगंटी, विशाल दामेर, चिरंजीवी ताल्लापेल्ली, अविनाश उष्कमल्ला, सन्नी मंडल, राकेश कैतल, विशाल अद्दुर, आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांमध्ये प्रीती विकास तांगडे, पूर्णिमा संदीप कांबळे, भाविका सतीश आटे, वैशाली बंडू दुर्योधन, करुणा नितेश भमल, अनिता विठ्ठल जुनारकर, उषा महिपाड वामनिक, वैशाली शंकर पोपटकर, माया विलास भगत, सुनिता प्रफुल पाटील, सारिका दिलीप दुरटकर, रत्नमाला किन्नाके, तेजस्विनी मारुती दुरटकर, आयेशा फिरोज शेख, पार्वती मंगेश पचारे, रूपा नागपुरे, बेबीबाई पेटकर, पुष्पा नागपुरे, सुनीता गेडाम, मेघा पाझारे, बबीता कांबळे, उषा मडावी, ममता दुर्गे, विशाल गोहिल, रंजना नपले, सुजाता करमनकर, वंदना लोहकरे, फुल कुमारी, संगीता बावस्कर, राधाबाई गोगला, चंदा दुर्गा, डागे आई, सुनिता गेडाम, इंदुबाई जादव, बबीता पारसीवे, निशा बेग, प्रीती पाझारे, उर्मिला साहेबराव गाडगे, सुनिता चिवाने, माही गजगंटी, लता चोपने, छाया संशेदे, आशा वंझे, शारदा आइलवार, सिंधु पखाले, सपना वासेकर, वर्षा, मीणा वासेकर, संदीप वाघमारे, अनीता जुनारकर, तानाबाई, पार्वता पाराशिव, निशाबी शेख, वनिता कोडापे, फूलकुमारी, सुशीला निषाद, छाया, योजना उल्लास पिंपलकर, कंचन अशोक वर्मा, शांताबाई कोइचाडे, नीताबाई कोयचाडे, पूजा कोयचाडे, प्रतिभा कोयचाडे, जया कोयचाडे, अरुना बुराडे, मनीषा उइके, सुनंदा मोदक, करुणा कोयचाडे, शुभांगी संदीप बोधे, सोनाली संतोष बोधे, वर्षा पिंपलकर, राधाबाई कोयचाडे, कांता तेलकर, छाया किशन कोयचाडे, सुषमा पिंपलकर, सुरेखा झाड़े, अर्चना शंकर कोडापे, माया भारत कुत्तरमारे, राशिका विट्ठल लोखंडे, पूर्णिमा मंगल नगरकर, सविता अशोक नगरकर, सुचिता बिवसा टेकाम, गिरिजा संजय क्षिरसागर, सुनीता टेकाम, प्रबोधिनी मंगल पथाडे, माया कासव, ज्योति वाघमारे, लता श्याम कुमार सावे, ताइबाई कोइचाडे, प्रियंका सूरज कोड़ापे, रत्नमाला कुडमेते, शुभांगी कोडापे, अश्विनी टेकाम, करिश्मा मढ़कम, सिंधु शिवकर, मनीषा आतराम, तिर्वाना मड़कम, विमल क्षीरसागर, कुसुम चंद्रशेखर पिंपलकर, सुनीता भागेकर, कविता कांबळे, शीतल गागरगरगुंडे, किरण टीप्लेले, मनीषा अत्राम, अर्चना पर्चाके, कानेबाई नगरकर, जोसना मस्के, पंचकूला कोहडे, ज्योति मडके, ललिता कोइचाडे, लीलाबाई बाचलवार, सुविधा कोयचाडे, करुणा टेकाम, उषा मडावी, मीरा कोइचाडे, मंदा बोडे, कलिंदा कोयचाडे, ज्योती प्रशांत वाघमारे, कुसुम लोखंडे आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ता, इतर लोक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये