Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुरक लॉन दयालनगर, वर्धा येथुन मोपेड व मोटर सायकल चोरणारा आरोपी गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          सविस्तर असे की, नमुद घटना ता वेळी व स्थळी यातील. नमुद फिर्यादी नामे मोहम्मद हनीफ मोहम्मद ईसहाक वय 61 वर्षे रा. साई अपामेंट तुरकलॉन दयालनगर वर्धा. यांनी त्यांची एक पांड्या रंगाची होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड जिचा क्र. MH-32, z-5520 किंमत 35,000 रु ची साई अपार्मेट तुरकलॉन दयालनगर वर्धा. येथुन हि. दिनांक 13/09/2024 रोजी अंदाजे सकाळी 10/30 वाजता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 1459/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडुन खात्रीशिर मिळालेल्या माहीती वरुन आज दिनांक 26/09/2024 रोजी नारोपी नामे महादेव राजु मुळे वय 24 वर्षे रा. पिपरी मेघे वर्धा. यास पिपरी मेघे वर्धा. येथुन ताब्यात घेवुन पंचा समक्ष सदर गुन्हयातील (1) एक पांढऱ्या रंगाची होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड जिचा क्र. MH-32, Z-5520 किंमत 35,000 रु ची मोपेड गाडी, तसेच बोरगाव मेघे वर्धा येथुन 2) एक पांढऱ्या रांगीची बजाज कंपनीची पल्सर 200 मोटर सायकल 4क. MH-48,R-4845 किंमत 55,000/-रू. ही सुद्धा चोरल्याची दोन पंचा समक्ष कबुली दिल्याने जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पो.नि. पराग पोटे, स.पो.नी. विकास गायकवाड यांचे निर्देशनानुसार पो.स्टे.वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा.राजेश राठोड ब.क्र.879, पो. अंमलदार सुरज जाधव ब.क्र. 1586, संभाजी मुंडकर ब.क्र. 1649, अशफाक शेख ब.नं. 1600 यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये