Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयाने पटकाविला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

      महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागद्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ हे अभियान महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करिता राबविण्यात येत असून या अभियानात तालुक्यातील अग्रगण्य स्थानी असलेल्या भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावलीने सत्र २०२४-२५ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या अभियानात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

राज्य शासनाने माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानामध्ये केंद्र स्तर, तालुका स्तर,जिल्हा स्तर,विभाग स्तर आणि राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांकरिता रोख स्वरूपात पारितोषिक देण्याची घोषणा शासनाने केलेली आहे, या अभियानात सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी व्यवस्थापन आणि जिल्हा परिषद व्यवस्थापनेतील शाळांनी सहभाग घेतलेला होता. त्यात विश्वशांती विद्यालयाने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे राज्य शासनाकडून सदर शाळेला तीन लाख रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधासाठी ३३ गुण,शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण तर शैक्षणिक संपादणूकीसाठी ४३ गुण असे गुणविभागणी करण्यात आली होती त्यात विश्वशांती विद्यालयाने तालुक्यात सर्वाधिक गुण प्राप्त करून आयोजित अभियानात तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि शालेय प्रशासनाचे बळकटीकरण व शैक्षणिक या घटकावर आधारित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या अभियानात विद्यालयाने सहभाग घेत डिजिटल शाळा,पायाभूत सोयीसुविधा,विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्व विकास,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,परसबाग,स्वयम पोर्टल, विद्यांजली पोर्टल,भाषा प्रयोगशाळा,महावाचन उपक्रम, आनंददायी शनिवार,स्पर्धा परीक्षा अशा अनेक घटकांवर उत्कृष्ट काम केल्यामुळे विश्वशांती विद्यालयाने सावली तालुक्यात पहिला क्रमांक पटकाविलेला आहे.

  शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार, शाळा समितीचे अध्यक्ष अनिल स्वामी, संस्थेचे सर्व पदाधिकारी,पंचायत समिती सावलीचे संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे, केंद्रप्रमुख जगन्नाथ वाढई तसेच संपूर्ण पालक वर्गांनी अभिनंदन केले.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये