ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भिषण अपघात – अज्ञात ट्रकने २४ वर्षीय युवकांस चिरडले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- चंद्रपूर वरून बल्लारपूर मध्ये राहणाऱ्या युवकाचा बहिणीच्या घरी येत असतांना पेपर मिल गेट नं. ७ चा समोर एका अज्ञात ट्रकने मोपेड वर बसलेले दोघे मित्राना  मागून धडक दिल्याने त्यात एक घोडपेठ रहिवासी मृतक भूषण राजू उमरगुंडावर (24)हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सोबत त्याचा मित्र सतीश लोखंडे रा, म्हतारदेवी, घुग्गुस जि, चंद्रपूर किरकोळ जखमी झाला आहे.

शिवनगर वॉर्ड नाट्यगृहचा मागे मृतकाची बहीण /जावई येथे मुलीचा घरी वडील आल्याने त्यांना भेटण्याकरिता दोघे येत होते, आणि रस्त्यातच भयंकर अपघात झाला. भावाचा अपघाती मृत्यू झाल्याने बहीण व जावई कृष्णा उप्पलवार व वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

बल्लारपूर पोलिसांनी अपघात स्थळ गाठून मृताकाचे शव  ग्रामीण रुग्णालयला शवविच्छेदन करिता पाठवण्यात आले असून अज्ञात ट्रकचा शोध बल्लारपूर पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये