Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडीने घटक पक्षांशी मोट बांधुन रिपाइं (ए) ला समान भागीदारी वाटा द्यावा! – महेद्र मुनेश्वर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) महाराष्ट्र प्रदेश तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये व राष्ट्रीय महासचिव डा मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनात चेंबुर (मुंबई) येथील केंद्रीय कार्यालयाच्या सभागृहात नुकताच २२ सप्टेंबर (रविवार) रोजी मंथन कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.या वेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी महिला प्रदेश अध्यक्षा सुनिताताई चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ,महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास जोगदंड,महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक ससाने,महाराष्ट्र प्रदेश सचिव कैलास मोरे,महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रियदर्शनी निकाळजे,विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर,महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष तानाजी मिसळे,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश नेते सचिन खरात,उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत दरोळे,विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र नितनवरे,ठाणे जिल्हा महासचिव व अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे,वर्धा जिल्हा महासचिव सुधीर सहारे,विदर्भ संघटक समाधान पाटील,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष रूपाताई वायदंडे,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत तुळशिकर,मुंबई प्रदेश संघटक नितीन जाधव,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश घुगे,मराठवाडा प्रभारी सुरेश दाभाडे आदी नेत्यांनी मेळाव्याला विचारमंचावरुन मार्गदर्शन केले.मोठ्या संख्येने रिपाइं (ए) प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी राजवट देशात वेगाने हुकूमशाही करतांना दिसत आहे.त्यामुळे देशाची लोकशाही व संविधानिक संस्था धोक्यात आल्या आहेत.शोषित,पीडित,वंचित,बहुजन माणूस तसेच शेतकरी,तरुण,कामगार व गरीब कष्टकरी भयभीत आहे.त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपा महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीने सर्व घटक पक्ष व पुरोगामी विचाराच्या संघटनांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राज्यात सज्ज होणे काळाची गरज आहे.अशी भूमिका राज्य स्तरिय रिपाइं (ए) च्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी मांडली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया अलायन्स ’ महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्यात भाजप महायुतीचा खिसडा झाला. इंडिया अलायन्स महाविकास आघाडी सोबत प्रचंड संख्येने रिपाइं (ए) कार्यकर्ते होते त्यामुळे आंबेडकरी जनतेने राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना एकजुटिने मतदान केले.महाविकास आघाडीचे राज्यात ३१ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले व लोकसभेचे खासदार झालेत.

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रिपाइं (ए) सोबत गद्दारी करु नका, गद्दारी कराल तर पश्चातापाशिवाय महाविकास आघाडी च्या प्रमुख नेत्यांकडे पर्याय उरणार नाही.घटक पक्षांशी मोट बांधुन प्रामाणिकपणे रिपाइं (ए) ला समान भागीदारी वाटा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने द्यावा.” यामुळे राज्यातील भाजपा महायुती सत्तेपासून कोसोदुर गेलेली दिसेल,अशी भूमिका सुध्दा विदर्भ प्रदेश रिपाइं (आंबेडकर) नेते महेंद्र मुनेश्वर यांनी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी मुंबई येथे मांडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये