Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एनसीसी छात्र सैनिकांची कार्यशाळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) चा अभ्यासक्रम संरक्षण दलात कार्यक्षम तरुण-तरुणींना सामील होता यावे या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला असून यात प्रथमोपचार व शारीरिक व मानसिक आरोग्य यावर भर दिलेला आहे. या दृष्टिकोनातून स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या एनसीसी युनिट ने ‘शारीरिक व मानसिक आरोग्य’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन 25 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या एनसीसी हॉलमध्ये करण्यात आले.

महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ नीलिमा बर्गट यांनी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करून एनसीसी विभागाचे प्रथम पुष्प गुंफले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनिता सोनारे तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सोनारे म्हणाल्या आजच्या धावपळीच्या युगात शारीरिक व मानसिक स्वास्थ टिकविणे गरजेचे आहे आणि याकरिता प्रत्येक तरुण-तरुणींना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे तर एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले तसेच पोलीस दलात काम करताना बऱ्याचदा तणावपूर्ण वातावरणात राहावे लागते अशावेळी शारीरिक व मानसिक स्वास्थ टिकवण्याचे कौशल्य माहीत करून घेणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून एनसीसीचा शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हा अभ्यासक्रम फायदेशीर आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संचालन अंडर ऑफिसर सुप्रिया यादव तर आभार अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी हिने मानले. यशस्वीते करिता रोव्हर लीडर संतोष तुरक, अंडर ऑफिसर आदर्श नाईक सार्जंट आदित्य तामगाडगे, साक्षी येळणे व छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये