जि. प. प्राथ. शाळा, खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील खडकी येथे जि. प. प्राथ शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.. विविध उपक्रमासाठी परिचित असणारी अशी ही शाळा ..महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारत माता यांची वेशभूषा केले ली चिमुकली, गावातील जेष्ठ मंडळी, माता भगिनी, तरुण मंडळी, आणि विद्यार्थी सर्वांचा सहभाग मोठा होता.. प्रभात फेरी,ध्वजरोहन,चिमुकल्या मुला मुलींची भाषणे, देशभक्ती पर गीत..सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम झाला.
श्री तुमराम सर मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे महत्व प्रतिपादन केले शाळेच्या विकासासाठी राबवत असलेले उपक्रम या विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरिभाऊ किन्नाके अध्यक्ष शा. व्य. स., प्रमुख पाहुणे सुनंदा मेश्राम उपाध्यक्षा शा. व्य. स. अरुण कुमरे,प्रभाकर वेरकाडे, अनुसया किन्नाके, सोनू तोडसे, अश्विना कुमरे,अर्चना पेंदोर, संकटराव गेडाम पोलीस पाटील,गावातील प्रतिष्ठित नागरिक देवराव तोडसे, बापूजी किन्नाके, भोजूजी गेडाम, शत्रुघ्न उरवते, अंगणवाडी सेविका रेगुंडावर मॅडम यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे संचालन श्री समरीतकर सर यांनी केले.