प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांवर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप
पाण्याच्या टाकीवर चढून भद्रावतीत आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील पीपरी (दे) गावातील शेतकऱ्यांकडून तलाठी अनिल गहुकर यांनी लाच मागितल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करण्याचे खोटे आश्वासन दिल्याने संतप्त भाजयुमो कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोरील जलशुद्धी केंद्रातील पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी करत आहेत.
या निषेधामुळे प्रशासनाचा विरोध होत असून, शेतकरी व तरुण संघटनेतील तणाव वाढला आहे.
भद्रावती तालुक्यातील पीपरी (दे) गावातील लाचखोर तलाठी अनिल गहुकर याने लाच मागितल्याचा गंभीर आरोप येथील स्थानिक शेतकऱ्यांकडून केला गेला होत.
या प्रकरणी प्रशासनाने मोठ्यात मोठी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते आश्वासन फक्त शब्दातच राहिले.
या निषेधार्थ भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार विरूगिरी करीत आंदोलन करीत आहेत.
हे आंदोलन प्रशासनाविरोधात आणि तलाठीच्या लाचखोरी व भ्रष्टाचाराविरोधात होत आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या आंदोलनाला मोठे समर्थन मिळत आहे.
शेतकऱ्यांकडून तलाठी ने लाच मागतली या विरोधात येथील युवकांना आवाज उठविण्याची वेळ आली नसुन आता तरी त्या लाचखोर तलाठ्यावर प्रशासनाची कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. भाजयुमोचे कार्यकर्ते पुढील कारवाई लवकरात लवकर व्हावी या विषयावर ठाम असल्याचे संकेत देत आहेत.
या घटनेने तालुक्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून येते.
प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे.