शेतकरी कल्याण निधीचा व राजीव गांधी स्वावलंबन योजनेचा लाभ शेतकयांना देण्यासाठी प्रयत्न करून बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारावे – संतोषसिंह रावत
चांदा ब्लास्ट
मुल- महिला बचत गटाची निर्मिती झाल्यानेच सावकारी मक्तेदारी बंद झाली व महिला महिला सक्षम आत्मनिर्भर होऊन एकत्र संघटित झाल्या याचा बँकेला अभिमान आहे. यासाठीच शेतकरी कल्याण निधीचा व राजीव गांधी स्वावलंबन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळऊन देण्यासाठी प्रयत्न करावे. असे विचार उद्धघाटनिय मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत यांनी केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पो पोभूर्णा येथे आयोजित केलेल्या महिला वचतगट व शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक ललित मोटघरे यांनीही बँकेच्या योजनांची माहिती दिली. तर प्रमुख अतिथी संचालिका नंदाताई अल्लुरवार यांनी सहकारी बँकेची निर्मितीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी झाली. आणि बँकेच्या अध्यक्ष पदावर संतोषशिंह रावत बसले तेंव्हापासून बँकेला ९२ कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. त्यांच्यामुळेच बँकेची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. अशाच व्यक्तीची गरज आज तुम्हाला आम्हाला व जनतेला आहे. असे विस्तृत विचार व्यक्त केले. याप्रसंगी संचालिका प्रा. प्रभाताई वासाडे यांनीही संतोष भाऊ रावत यांच्या कारकीर्दीत अनेक विकासात्मक योजना राबऊन महिलांना व शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी अनुभवी संचालक राजेश रघाताटे उपस्थित होते.
सरपंच हिमानी वाकुडकर व माजी तालुका अध्यक्ष ओमेश्वर पदमगिरवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जय सेवा महिला वचत गट, जय दुर्गा महिला बचत गट, जय परसापेन महिला बचतगट यांचा अध्यक्ष व संचालक यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शंकर लोडे यांनी केले. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर कल्याणकर व प्रशासन विभागाचे सहा. व्यवस्थापक श्री मंगल वुरांडे, यांनी सविस्तर केले.
मंचावर सरपंच विलास मोगरकर, भालचंद्र बोदलकर, तालुका अध्यक्ष वासुदेव पाल, अशोक गेडाम, जगदीश शेम्ले सरपंच नांदगाव पोडे, अशोक साखलवार, मुल तालुका अध्यक्ष गुरु गुरणुले, वसंत मोरे, माजी नगरसेवक जयपाल गेडाम, सुनील कुंदोजवार, विनायक बुरांडे, पराग मुलकल्वार, नगर सेवक नरेन्द्र बुरांडे, धम्म निमगडे, प्राचार्य अमरसिंह बघेल, दादा ठाकरे, दिलीप म्याडावार, मुरलीधर टेकाम, पंढरी आवरी, व सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बंडुजी पेंदोर, प्रकाश नैताम, श्रावण तोडसे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. मेळाव्याला १५०० च्या वर महिला व शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.
मेळाव्याचे आभार विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार, यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखा व्यवस्थापक, विभागीय अधिकारी यांनी परिश्रम घेतले.