Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा महावाचन उपक्रमाचे विजेते शिक्षक गोविंद पेदेवाड यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दिनांक 17 सप्टेंबर 2024 ला विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रमांतर्गत जिल्हा महावाचन उपक्रमाचे विजेते शिक्षक गोविंद पेदेवाड यांचा पंचायत समिती कोरपना येथे सत्कार करण्यात आला.

            चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विवेक जॉन्सन साहेब तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनात विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रम अंतर्गत जिल्हा महावाचन उपक्रमाचे विजेते गोविंद पेदेवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा व कोरपना तालुक्यातील पोस्ट ऑफ मंथ ऑगस्ट 2024 चे मानकरी कैलास पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवा यांना पंचायत समिती कोरपना येथे सन्मानित करण्यात आले.

          यावेळी सचिन कुमार मालवी (गटशिक्षणाधिकारी) यांनी सांगितले की, विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रम शिक्षकांसाठी प्रेरणादायी तथा अभिनव उपक्रम असून यातून शिक्षकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिक्षकांना सन्मानित केले जाते. तसेच यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळेल व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास साध्य करता येईल.

        या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय विजय पेंदाम (गटविकास अधिकारी), प्रमुख अतिथी माननीय सचिन कुमार मालवी (गटशिक्षणाधिकारी) पंचायत समिती कोरपना तसेच शिक्षण विस्तार अधिकारी लोकेश खंडारे, कल्याण जोगदंड, आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये