Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर पुरुषांचे मोठे योगदान – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भारताला स्वातंत्र्य मिडण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्याला स्वातंत्र्य मिडवून दिले आहे त्या थोर पुरुषांचे स्मरण होणे महत्त्वाचे असून आपण सर्वांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे असे विचार प्रा विजय आकनुरवार यांनी व्यक्त केले ते लखमापूर येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व राजुरा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण जुमनाके होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा विजय आकनुरवार उपस्थित होते तर यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य शुभम थिपे,प्रमोद सिडाम,प्रतिष्ठीत नागरिक मोरेश्वर उरकुंडे,प्रशांत वाघाडे,नामदेव एडमे,समाधान वासाडे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण व पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व राजुरा मुक्ति संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला व मुक्ति संग्राम दिनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रोशन भोयर यांनी केले व आभार प्रतीक पिंपळशेंडे यांनी केले कार्यक्रमासाठी वाचनालयाचे श्रीकृष्ण देवाडकर, गणेश गव्हाणे,गौरव चटप,दिपक भोयर,आदित्य गव्हाणे, साहिल जुनघारे, सुरज उपरे,प्रतीक बुरान, निशांत चौधरी, वैभव भोयर व गावकऱ्यांनी सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये