Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक धर्मराज काळे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, कनिष्ठ महाविदयालय गडचांदूरचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांना 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनी शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्राप्त झाला. त्यानिमीत्ताने संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार शरदराव पवार महाविदयालयाच्या सभाग्रहात मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचे औचित्य साधून दि. 17 सप्टेंबरला करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. तर प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे, संचालक तथा माजी सभापती नोगराज मंगरुळकर, माधवराव मंदे, प्राचार्य संजयकुमार सिंह, प्रा. संजय गोरे, संजय गाडगे मुख्याध्यापक संजय गांधी विद्यालय पेल्लोरा, विनोद हेपट मुख्याध्यापक स्व.हरिभाऊ डोहे विद्यालय कोरपना, पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या वर्षा खोडके, ई. उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक धर्मराज काळे, सौ. अर्चना काळे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह तथा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापक काळे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. सत्कारमूर्ति काळे यांनीही संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, संचालन प्रा. प्रशांत खैरे, तर आभार प्रदर्शन प्रा. जहिर सैयद यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले विद्यालय क. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संस्थेअंतर्गत संचालित सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, कनिष्ठ व्याख्याते,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये