ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केद्राची सेवा कोलमडली – किशोर करड़े

डॉक्टरा वीणा रुग्णांचे हाल ; वरिष्ठ अधिका ऱ्याचे दुर्लक्ष., तालुक्यात ताप, सर्दी, खोकल्याची

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक उपचार मिळण्याकरिता गाव तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टरांची कमतरता व कर्मचाऱ्यांची रिक्त असलेल्या पदामुळे रुग्णसेवा कोलमडलेली दिसतो आहे.

सावली तालुक्यातील लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दोन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र दोन्ही डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही त्याच्यामुळे रुग्णांची हेड सांड होत आहे

लोंढोली आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास १५ ते १६ गाव असून या ठिकाणी एक एमबीबीएस व एक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र एमबीबीएस डॉक्टर चांदेकर साहेब सतत गैर हजर राहत असल्यामुळे बी एम एस असलेले डॉक्टर अनेकदा स्वतः काम बघतात माञ त्यांना काही कामे आल्यास रुग्ण सेवेत कसुर होत असतो अनेकदा दवाखान्याचा कारभार सीएच ओ बघत असतात एकंदरीत तालुक्याचा विचार केला तर अनेक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक mpw कमतरता भासतो आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रुग्णसेवा योग्य भेटत नसल्यामुळे अनेकदा त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरची वारी पकडावी लागतो आहे त्यामुळे आरोग्य विभागावर अणि सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

सावली तालुक्यातील लोंढोली ग्रामीण भागातील गाव असल्यामुळें प्रसुती महिला, व विविध आजाराचे रुग्ण येत असतात सध्या पावसाळी सीजन चालू असून अनेक रोगराईचे थैमान आहे अशातच स्थानिक वैद्यकीय अधिकारी नसल्याने डॉक्टरांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे रुग्णांच्या सेवात अडचण निर्माण होत असल्यामुळे वरील दोन्ही डॉक्टरांना या ठिकाणी २४ तास सेवा देण्यासाठी तत्पर करावे अणि प्रशासनाने , अणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांची योग्य सोय करण्यात यावी अशी किशोर करड़े यानी केली.

सावली तालुक्यातील लोंढोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर्स उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णसेवा खंडित होत आहे छोट्या मोठ्या आजारांना गडचिरोली सावली चंद्रपूर जावे लागते आहे त्याचा गोरगरीब जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

                     सरपंच किशोर कारडे, कढोली

मी एकटीच आरोग्य केंद्र ला तीस दिवस राहू शकत नाही

 २४ तास सेवा देण्यासाठी मी एकटी काय करु मी तर चांदेकर सरांना आणू शकत नाही त्या मुळे दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी.

                      वैद्यकीय अधिकारी गोवर्धन

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये