ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोदक स्पर्धेमध्ये महिलांमधील सुप्त गुणांचे सुंदर प्रगटीकरण – डॉ.अभ्युदय मेघे यांचे प्रतिपादन

मोदक स्पर्धेत अनेक महिलांनी घेतला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मोदक स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. महिलांमध्ये असलेल्या सूक्त गुण सर्वांसमोर यावा व त्यांना त्यांची कला जोपासता यावी हा उद्देश या स्पर्धेच्या मागे ठेवण्यात आला होता अशी प्रतिपादन वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे यांनी साई मंदिर परिसरात आयोजित मोदक स्पर्धेत केले.

वर्धा सोशल फोरम व लिनेस क्लब द्वारा आयोजित भव्य मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून शिशी बजाज,परीक्षक म्हणून डॉ.अरुणा जैन, शितल ढोमणे, सौ मनीषा मेघे, लिनेस क्लब चे अध्यक्ष गीता गवते, वघळे स्टीलच्या संचालिका अपेक्षा वघळे मंचावर उपस्थित होते.

शशी बजाज म्हणाल्या,अश्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या जुन्या रुढी परंपरा जोपासल्या जाते आहे.त्यामुळे दर वर्षी अश्या स्पर्धेचे आयोजन दर वर्षी करावे.अशी विनंती देखील यावेळी त्यांनी केली. स्पर्धेच्या परीक्षका अरुणा जैन यांनी मोदक स्पर्धेच्या निमित्ताने संतुलित आहाराचे महत्त्व महिलांना समजून सांगितले.

या स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक सौ साधना पवार यांना तर दुसरे बक्षीस सौ विजया तिमांडे आणि तिसरे बक्षीस सौ अंजली नाखाले आणि ४ जणांना उतेजनार्थ बक्षीस भारती हिवाळे, शितल भोंगे, रीना चलाख, श्रुती पिसे देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायनेस शुभदा रुद्रकार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहित सहारे, लिनेस क्लब सचिव प्रतिभा ठाकूर, प्रतिभा वाळके, ज्योती देवतारे ,सुनीता बावनेर, रंजना सरोदे, रंजना पोटदुखे राजू कोरडे, मनीष तेलरांधे, अमोल डोळे, श्याम परसोडकर यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये