Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे हिंदी दिवस निमित्त निबंध स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे 14सप्टेंबर 2024 ला राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्त शालेय विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे तर प्रमुख मार्गदर्शक शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व तसेच हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हिंदी दिवस निमित्त शाळेतील वर्ग 5 ते 10 वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी ‘समय का सदुपयोग’, तसेच ‘जल है तो कल है’ या विषयावर निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन जीवन आडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेश पाटील, बावनकर, मांढरे, भुवनेश्वरी गोपमवार, श्रीकांत उरकुडे, यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये