Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारचाकी वाहनासह विदेशी दारुचा एकूण 5 लाख 87 हजारांवर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    दिनांक 14/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ची पथके पो. स्टे. देवळी परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून यातील एक पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची rits चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 49 B 9854 ने यवतमाळ जिल्ह्यातून देवळी मार्गे वर्धा येथे विदेशी दारू चा मोठा साठा घेऊन येत आहे. अशा माहितीवरून देवळी रेल्वे पूल येथे नाकेबंदी केली असता सदर वाहन येतांना दिसून येताच पोलीस स्टाफ चे मदतीने नाकेबंदी करून आरोपी अमीत ऊर्फ पिंटू रमेश अग्रवाल, वय 38 वर्ष, रा. राजकला टॉकीज समर्थ वाडी, वर्धा यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यास पोलीस दिसताच वाहन रोडवर उभे करून शेतात पळून जात असतांना त्यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले त्याचे रिटस चारचाकी गाडीची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता गाडीचे डीक्की मध्ये वरील प्रमाणे – 1) विदेशी दारूने भरलेल्या OC BLUE कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिशा कि. 16,800/-रू, 2) विदेशी दारूने भरलेल्या Officer’s Choice कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल.च्या 90 सिलबंद शिशा कि. 27,000/-रू,3) विदेशी दारू ने भरलेल्या रॉयल स्टेग कंपनीच्या प्रत्येकी 180 एम एल च्या 90 सीलबंद शिशा कि. 31,500/-₹,4) बडवाईजर कंपनीच्या 500 एम. एल. ची बियरने भरलेली 06 टिन कि. 2,100/-रु.5) एक मोबाईल कि. 10,000/-रु.6) एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार MH 49 B 9854 कि. 5,00,000/-रू.

असा जु.किं 5,87,400/-रू चा मुद्देमाल जप्त केला. आरोपी क्रमांक 01 या सदर विदेशी दारू बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा यवतमाळ येथील के. आर. वाईन शॉप रा. यवतमाळ येथून विकत आनल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपीतांविरुध्द पो. स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उप.नि. सलाम कुरेशी, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, रितेश शर्मा, महादेव सानप, पोलीस अंमलदार मनिष कांबळे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये