ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप मुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक शंकर तुरानकर,सौ विना देशमुख उपस्थित होत्या.

वेशभूषा स्पर्धा मध्ये माध्यमिक विभागात ८४ तर पूर्व माध्यमिक विभागात ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक जिया पठाण, द्वितीय नंदिनी रॉय, तृतीय क्रमांक वास्तवी पालीवाल, उत्तेजनार्थ पारितोषिक समय पारखी याला मिळाले. पूर्व माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक प्रणय बावणे, द्वितीय क्रमांक मनस्वी परसुटकर, तृतीय क्रमांक पूर्वा रामटेके, प्रोत्साहन पुरस्कार सम्यक शंभरकर याने पटकावला .

प्रास्ताविक मनोहर बुऱ्हान यांनी केले. संचालन श्र्वेतलणा टिपले यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती घोंगे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येलादी, बोलण टेकाम यांनी मेहनत घेतली.

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये