ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला सक्षमीकरण कार्यक्रम महिलांनी स्वावलंबी बनून प्रगती करावी – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महिलांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतः स्वावलंबी बनून सर्व क्षेत्रात आपली प्रगती करावी असे आवाहन रासेयो चे माजी जिल्हा समनवयक व माजी उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले ते लखमापुर येथील सभागृहात अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही व लखमापूर ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळावा आणि महिला सक्षमीकरण व हळदीकुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सदर कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रमाला अंबुजा फाउंडेशन कार्यक्रम समनवयक जितेंद्र बैस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सरपंच अरुण जुमनाके, उपसरपंच संभाजी टेकाम, दानशूर गिरीजाबाई मडावी, पुरुषोत्तम पिंपडशेंडे,प्रविना विनोद टोंगे, सौ लता थिपे,प्रमोद सिडाम,प्रा सुधीर थिपे,संदीप बावणे,संगीता आत्राम आदि मान्यवर उपस्थित होते जितेंद्र बैस यांनी महिलानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपले संघटन कौशल्य वाढवावे असे ते म्हणाले यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली.

यावेळी कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना हळदीकुंकू लावले व एकमेकांशी आपुलकीने वागले यावेळी महिला भगिनींनी आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळीं मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन नेहा जगताप यांनी तर आभार शकुंतला पोयाम यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये