ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इनर व्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने विद्यार्थ्यांची दंत तपासणी

जवळपास १६० विद्यार्थ्याना याचा झाला फायदा

चांदा ब्लास्ट

दि. ५ जुलै रोजी दाताळा येथील जिल्हा परिषद शाळेत इनर व्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने विद्यार्थ्यांची दंत तपासणी आयोजित करण्यात आली जवळपास १६० विद्यार्थ्याना याचा फायदा झाला. प्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉ. आशिष गजबे आणि डॉ. स्वाती गजबे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करने आणि खाल्ल्यावर गुरळा करने असे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री भोगेकर सर व शाळा समिती च्या अध्यक्ष मुगले ताई व इतर शिक्षक गण त्या वेळी उपस्थित होते. इंनर व्हील तर्फे अध्यक्ष राखी बोराडे, सचिव अंजली उत्तरवार, प्रकल्प निर्देशक वसुधा बोडखे आणि कोशध्यक्ष सुचिता जेऊरकर उपस्थित तसेच त्यावेळी शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षवरोपन साठी औषधी वनस्पती देण्यात आली व पोषक आहार म्हणून शेंगदाणा चिक्की वाटप करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये