ताज्या घडामोडी

समदृष्टी क्षमता विकास एव अनुसंधान मंडल (सक्षम) चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठित

जिल्हा अध्यक्ष म्हणून चंद्रपुरातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ डॉ चेतन नागरेचा व सचिव मनोज साळवे यांची घोषणा

चांदा ब्लास्ट :

चंद्रपूर, :      विकलांग, दिव्यांग यांचे सर्वांगीण विकास व कल्याणासाठी अखिल भारतीय संघटन म्हणून सक्षम कार्यरत आहे. या संस्थेची चंद्रपूर जिल्ह्यात स्थापना आश्रय बालगृह चंद्रपूर येथे नूतन  कार्यकारणी घोषणा करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंद पाठक, प्रमुख वक्ते सक्षमचे प्रांत संघटनमंत्री आशुतोष देशपांडे उपस्थित होते.          प्रमुख अतिथी मुकुंद पाठक यांनी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून चंद्रपुरातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ  डॉ चेतन नागरेचा व सचिव  मनोज साळवे यांची घोषणा करण्यात आली.          त्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ चेतन नागरेचा यांनी उर्वरित कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. विनय लिंगे, दिनेश हजारे, सह सचिव प्रवीण गिलबिले, प्रकाश राजुरकर, कोषाध्यक्ष मोहन सिरास, संपर्क प्रमुख सचिन चींचमलकर, अजय वैरागडे, प्रचार प्रसिध्दी प्रमुख प्रविण बतकी, सदस्य राजेंद्र चन्ने, मयुर घटे, शैलेश दिंडेवर, रुपेश देरकर, वृषाली मोहितकर, अजय देशमुख, रमेशजी जैन, हसमुख भाई ठक्कर, सतपालजी जैन यांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते आशुतोष देशपांडे यांनी सक्षम बद्दल माहिती व आगामी कार्यक्रम म्हणून मार्गदर्शन केले. डॉ चेतन नागरेचा व मनोज साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रविण गिलबिले व आभार प्रदर्शन दिनेश हजारे यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये