Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा मतदार संघातील अवैध धंदे बंद करा

भाजपा युवा मोर्चाचे संयोजक सुरज हनुमंते यांचे उपोषण सुरू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सिंदखेड राजा मतदार संघातील गणेश उत्सव,महालक्ष्मीउत्सव, नवरात्र उत्सव, बालाजी महाराज यात्रा दरम्यान सिंदखेड राजा मतदार संघातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी मतदार संघाचे भारतीय जनता युवा मोर्चाचे संयोजक सुरज धर्मराज हनुमंते यांनी येथे बस स्थानक चौकात आज पासून उपोषण सुरू केले आहे.

 सविस्तर वृत्त असे की हनुमंते यांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला या संदर्भात निवेदन दिले होते त्यामध्ये त्यांनी सिंदखेडराजा मतदार संघातील विविध भागांमध्ये ग्रामीण भागात अवैधदेशी दारू, वरली मटका जुगार. आणि इतर अवैध धंदे सूरू असल्याने गणेशोत्सव,महालक्ष्मी उत्सव,नवरात्र उत्सव,बालाजी यात्रा उत्सव, दिवाळी, या सर्व सणाच्या दरम्यान अनेक खेडोपाडी राहणारे व मोलमजुरी करणारे खरेदीच्या नावाखाली पैसे घेऊन शहराकडे धाव घेतात यामध्ये मोलमजुरी करून कमावलेली रक्कम सदर ग्रामीण भागातील लोक वरली मटका जुगार इत्यादी मध्ये पैसे लावतात आणि त्यांची आर्थिक पिळवणूक होते त्यासोबतच ग्रामीण भागात ठीक ठिकाणी अवैध देशी दारूचे दुकान असून ग्रामीण भागातील युवा पिढी त्याला आहारी जात आहे एन सणासुदीच्या काळामध्ये सदर मध्यमवर्गीय लोकांच्या घरामध्ये कौटुंबिक कलह निर्माण होतो या बाबींना आळा घालण्यासाठी सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा यासाठी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला लेखी स्वरुपात निवेदन दिले होते. आणि उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता त्याच अनुषंगाने त्यांनी आज दिनांक १२ सप्टेंबर पासून देऊळगाव राजा बस स्थानक चौकात उपोषण सुरू केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये