Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी नगर मधील बच्चे कंपनी करत आहेत बाप्पांची सेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील बालाजी नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या बारा लहान बालकांनी एकत्र येत यावर्षी संत सावता महाराज कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये श्री बाल गणेश मित्र मंडळाची स्थापना करून मनोभावे बाप्पांची सेवा करण्यामध्ये दंग झाले आहे.

वय आठ ते बारा असे वयाच्या या 12 बालकांनी बच्चे कंपनीने बालाजी नगर परिसरातून आपल्या आपल्या ओळखीने वर्गणी जमा केली व यश वाघ या युवकाचे जागेत श्रींची मूर्तींची स्थापना केली सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने त्यांनी या परिसरातील रहिवाशांना व श्री गणेश भक्तांना आरतीचा मान मिळवून दिला, या वयापासूनच या बच्चे कंपनीला धार्मिक कार्याची ओढ लागल्याने त्यांचे पालक सुद्धा त्यांना या बाप्पांच्या सेवेसाठी वेळ देण्यासाठी मुभा देत आहेत.

तर दुपारचे वेळेस विविध खेळ खेळून ही बच्चे कंपनी इतरांना आकर्षित करून घेत आहे त्यांनी बाप्पांची मूर्ती सुद्धा आकर्षक आणली असून बाप्पाच्या मूर्तीला साजेसे असे डेकोरेशन सुद्धा केलेले आहे. या बच्चे कंपनीचा उत्साह वाढवण्यासाठी आरतीच्या वेळेस अनेक पालक मंडळी उपस्थित राहत आहे. श्री बाल मित्र गणेश मंडळाचे साहिल पंढरीनाथ नागरे, साहिल निकम,आदर्श चव्हाण,श्रेयस डिघोळे, वरद डोईफोडे,श्रीकांत जाधव,संग्राम हंडाळ,यश वाघ, साईराज देशमुख, शिवराज देशमुख, अर्णव चव्हाण,अर्णव नागरे ,हे मनोभावे सेवा करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये