मोहबाळा येथे आरोपीच्या घरातून तलवार जप्त
भद्रावती पोलिसांची कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यातील मोहबाळा येथे घरात अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीकडून तलवार जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी दिनांक आठ रोज रविवारला रात्रो साडेनऊ वाजता तालुक्यातील मोहोबाळा येथे केली. सिद्धांत मेघराज पेटकर, वय 31 वर्ष, राहणार मोहबळा असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी भद्रावती पोलिसांचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सदर आरोपी हा घरात तलवार बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पंचांना घेऊन सदर आरोपीच्या घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरालगत असलेल्या एका पडक्या घरात मैनसह एक तलवार आढळून आली. या तलवारी बद्दल आरोपी समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुंन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई ठाणेदार बीपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात एएसआय गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे यांनी केली.