मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित
चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदी प्रा.गजानन सातपुते तर सचिव पदी प्रा. देवीदास सालवटकर यांची निवड
चांदा ब्लास्ट
मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी राज्याध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत
कार्याध्यक्षपदी प्रा. गजानन सातपुते खडसंगी, सचिव पदी प्रा. देविदास सालवटकर वरोरा तर सल्लागार प्रा. डॉ सुधीर मोते भद्रावती यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्ह्याची आभासी पद्धतीने सभा घेण्यात आली. या सभेत राज्याचे अध्यक्ष सुनील डिसले, सचिव बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष डॉ मनिषा रिठे, सल्लागार डॉ विजय हेलवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आभासी सभा घेण्यात आली. या सभेत राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी चंद्रपूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर केली.
या कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. गजानन सातपुते यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी प्रा. देविदास सालवटकर यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ. सुधीर मोते भद्रावती प्राचार्य धर्मराज काळे गडचांदूर, प्राचार्य संजय मरसकोले नवरगाव यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत
जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र विखार, बोथली, तसेच संजय मुंडे जिवती, सहसचिव प्रा. रेणुका देशकर राजूरा, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. देवेंद्र प्रधान नागभीड, जिल्हा संघटक प्रा. किशोर ढोक भद्रावती, जिल्हा सहसंघटक प्रा. शुभांगी मोहितकर चंद्रपूर, प्रसिद्धी प्रमुख प्रा. संतोष बांदुरकर, गोंडपिपरी यांची निवड करण्यात आली.
या जिल्हा कार्यकारिणीत प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधींची निवड करण्यात आली. चंद्रपूर तालुका प्रतिनिधी प्रा. सरिता कंचेवार, भद्रावती प्रा. स्वाती गुंडावार, राजुरा प्रा. महेश गेडाम, पोंभूर्णा प्रा. विनोद कुनघाटकर, कोरपना प्रा. दिनकर झाडे, सिंदेवाही प्रा ग्यानिचंद गहाणे,
चिमूर प्रा. पद्मा भांडारकर, मूल प्रा. दुर्वास कडस्कर, ब्रह्मपुरी प्रा. प्रमोद भोयर, नागभीड प्रा. ताराचंद सोनकुसरे, वरोरा प्रा. मारोती मुंडे, गोंडपिपरी प्रा. रमेश हुलके सावली प्रा. राजु केदार, जिवती प्रा. विनोद दुर्वे , बल्लारपूर प्रा.नंदकिशोर काकडे यांची निवड करण्यात आली तर चंद्रपूर शहर प्रमुख प्रा. योगिता धांडे, यांची निवड करण्यात आली. याप्रमाणे सर्वानुमते चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली. या सभेला राज्याध्यक्ष, सचिव, सल्लागार, उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ सुधीर मोते, प्राचार्य धर्मराज काळे यांनीही मार्गदर्शन केले.
या सभेचे प्रास्ताविक प्रा. नामदेव मोरे अध्यक्ष यांनी केले. या आभासी सभेचे सुत्रसंचलन प्रा. संजय लेनगुरे राज्य कोषाध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष बांदूरकर यांनी केले. या सभेला प्रा. डॉ राजेंद्र सोनवणे समन्वयक, प्रा.सुरेश नखाते नागपूर, प्रा. यश पवार यवतमाळ, डॉ ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. विजया मने गडचिरोली, प्रा. पवन कटरे गोंदिया आदी मान्यवर उपस्थित होते.