Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. पांडुरंग सावंत यांचा नागपूर येथे सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती : तालुक्यातील गोंडवाना कनिष्ठ महाविद्यालय जिवतीचे प्राचार्य ह.भ.प.प्रा.डॉ.पांडुरंग माधव सावंत यांनी कीर्तन, भजन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या केलेल्या व विद्यार्थी हिताचे राबविलेल्या उपक्रमाच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री तथा नृत्य मार्गदर्शक रश्मी देशमुख यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कंवेंशन सेंटर, नागपूर येथे “विदर्भ गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच पत्रकारिता क्षेत्रात मागील दहा वर्षापासून आपल्या पत्रकारितेतून अनेक वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देईपर्यंत पाठपुरावा केलेल्या दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी दिपक साबने यांचा व सामाजिक कार्यकर्ता सुनील राठोड यांचाही सन्मान करून गुणगौरव करण्यात आला.

        एस.आर.एन.फिल्म प्रोडक्शन, इंडिया न्यूज २४, व जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने “विदर्भ गौरव पुरस्कार” वितरण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ओळखला जातो. या सोहळ्यात राज्यातील क्रीडा, पोलिस, वन, आरोग्य, शिक्षण, पत्रकारिता या विभागातील तसेच नाट्य व सिनेमा कलावंत, गायक, नृत्य, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गुण गौरव करण्यात आला. हा सोहळा दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे विदर्भाध्यक्ष राज वाधे, अभिनेता – दिग्दर्शक-निर्माता संजय भाकरे, अभिनेता- दिग्दर्शक-लेखक तथा दादासाहेब फाळके चित्रपट युनियन, नागपूरचे जिल्हाध्यक्ष सागर निकम, सिनेअभिनेत्री व न्युज इंडिया २४ च्या संपादिका शीतल नंदनवार, फर्स्ट आर्चर इंडिया अभिषेक ठवरे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रतीक पांडे यासह इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये