Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिपब्लीकन पार्टी आप इंडिया( A) यांच्यामार्फत कोरपना तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

प्रियाताई खाडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा विदर्भ अध्यक्ष महिला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे कोरपणा तालुक्यातील नागरिकेच्या सेवेसाठी विकास कामासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया नेहमी प्रयत्नशील राहत आहे मात्र शासनाच्या अलगर्जीमुळे आदिवासी बहुल भागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा व चांगले शिक्षण मिळण्याकरिता 6 सप्टेंबर रोजी प्रियाताई खाडे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा विदर्भ अध्यक्ष महिला यांनी कोरपणा तालुक्यातील 1 जेवरा ग्रामपंचायत अंतर्गत मोजा तुकडोजी नगर तांबडी येथील मागील 20 वर्षापासून वास्तवाने राहात असलेल्या 78 घराचा त्यांच्या हक्काचा निवारा असावा.

(2) गडचांदूर शहर येथील बंगाली कॅम्प येथे अंदाजे 150 घरांना अजूनही वीज पुरवठा नसल्याने ते कसे बसे जीवन जगत असून तेथील अंदाजे 150 घरांना लवकरात लवकर वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावे.

(3) कोरपना तालुक्यातील सर्व शैक्षणिक मुला मुलींना आवश्यक ते दस्तऐवज व कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता शिक्षणाकरिता लागणारे आवश्यक ते दस्तऐवज कोणीही दीरंगई न करता पुरवण्यात यावे या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास आम्ही आमरण उपोषणाला बसणार असून जर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील अशी प्रतिक्रिया प्रियाताई खाडे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा विदर्भ अध्यक्ष महिला, विकास कांबळे कोरपणा तालुकाध्यक्ष, राजूभाऊ नळे गडचांदूर शहराध्यक्ष, विवेक खाडे युवा नेते, निशाताई धोंगडे गायिका व समाज सुधार, विकी राज वानखडे,अडकू कुरसंगे, कोंडूजी सहारे, अमोल निमसटकर,असे अनेक महिला व पुरुष मोर्चेत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये