Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी विदेशी दारुचा एकूण 6 लाख 25 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 05/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ची 02 पथके पो. स्टे. रामनगर परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून एक सिल्वर रंगाची मारुती स्विफ्ट कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 40 ए.सी. 7393 चा चालक त्याचे त्याबाबतील कार मध्ये विना पास परवाना यवतमाळ नागपूर हायवे रोडनि देशी, विदेशी दारूसाठा घेवून पिपरी (मेघे) येथे येणार आहे.

अश्या माहिती वरून यवतमाळ नागपूर हायवे रोड चे सर्विस रोड वर जुनापाणी चौक, पिपरी (मेघे) रोडवर नाकेबंदी करून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो. रेड केला असता आरोपी यास पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला. पंचांसमक्ष मारुती स्विफ्ट कार क्र.एम.एच. 40 ए.सी. 7393 चि पाहणी केली असता कार मध्ये1) 06 खर्डाच्या खोक्यात ऑफिसर चॉईस विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. 336 सीलबंद शिश्या प्रति शिशि 300 /-रु प्रमाने 86,400/-रु.2) 01 खर्डाच्या खोक्यात ऑफिसर चॉईस ब्लू विदेशी दारूने 180 एम एल भरलेल्या 48 सीलबंद शिशि 350/- प्रमाने 16,800/-रु.3) रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 36 सिलबंद शिश्या प्रती नग 350/- रू प्रमाने किंमत 12,600/- रू. 4) 01 खर्ड्याच्या खोक्यात टँगो पंच देशी दारूने भरलेल्या 90 एमएल च्या 100 शिश्या प्रति नग 100/- रुपये प्रमाणे 10,000/-रुपये,5) एक सिल्वर रंगाची मारुती स्विफ्ट  कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 40 ए.सी. 7393 किमत 5,00,000/-रू **असा एकुण जु.कि. 6,25,800/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून सदर वाहनाचे चालका विरुद्ध पो. स्टे. रामनगर येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उप.नि. अमोल लगड, उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, गजानन लामसे, रितेश शर्मा, महादेव सानप, पोलीस अंमलदार मनिष कांबळे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, गजानन दरणे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये