Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वामनराव गड्डमवार यांचे कार्ये उल्लेखनीय आणि स्मरणात राहणारे – ना. विजय वडेट्टीवार

सावली येथे पार पडला स्व. वामनराव गड्डमवार यांचा जयंती सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
राजकिय क्षेत्रासोबतचं वामनराव गड्डमवार यांनी शिक्षण, कृषी आणि सामाजीक क्षेत्रात केलेेले जनता कदापी विसरणार नसून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सध्याच्या पिढीने अनुकरण केल्यास जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. असे मत ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
       भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीच्या वतीने संचालीत शैक्षणिक संस्थाच्या सहकार्याने स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जयंती सोहळयाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी सत्कार सोहळा आणि विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ना. विजय वडेट्टीवार बोलत होते.  काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाॅ. नामदेव किरसान, पदवीधर आमदार अँड. अभिजीत वंजारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, फिनीक्स अकॅडेमी वर्धाचे प्रा. नितेश कराळे, माजी आमदार देवराव भांडेकर, सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे, गडचिरोली जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, बॅंकेचे संचालक डाॅ. विजय देवतळे, विद्या प्रसारक शिक्षण मंडळ गोंडपिपरीचे अध्यक्ष सुभाषसिंह गौर, शिक्षण संस्था चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अनिल शिंदे, काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, सुर्यकांत खनके, अँड. दिगंबर गुरपूडे, पंजाबराव गांवडे, अंबिकाप्रसाद दवे आदि मान्यवर उपस्थित होते.
       स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. सोहळयाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केले. यावेळी आमदार अँड. अभिजीत वंजारी यांनी मनोगत व्यक्त करतांना स्व. वामनराव गड्डमवार यांनी जिल्हयात काॅंग्रेस वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे सांगीतले. खासदार डाॅ. नामदेव किरसान यांनी स्व. वामनराव गड्डमवार यांनी शैक्षणिक संस्थाची निर्मिती करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आमदार सुभाष धोटे यांनी स्व. वामनराव गड्डमवार यांच्या नेतृत्वात पक्ष कार्ये करण्याची संधी मिळाल्याचे सांगतांना वर्तमान परिस्थितीत निर्माण झालेले राजकिय चित्र नकोसे झाल्याचे सांगीतले. यावेळी संस्थेच्या वतीने आमदार अँड. अभिजीत वंजारी आणि खासदार डाॅ. नामदेव किरसान यांचा सत्कार करण्यांत आला.
       कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील प्रगतशील शेतकरी युवराज चौधरी, वामन बोरकुटे आणि प्रकाश घरत यांचेसह राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमाचा समारोप नितेश कराळे यांच्या मार्गदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे संचलन डाॅ. राम वासेकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली यांनी मानले. कार्यक्रमाला नागरीक आणि विद्यार्थी वर्ग मोठया संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये