Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निराधारांना आधार देणे हाच खरा माणुसकी धर्म – डॉ.रजनी ताई शिंगणे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आमदार मा.डॉ.राजेन्द्र शिंगणे यांची कन्या कु.लक्ष्मीताईच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या कन्या कु.लक्ष्मीताई यांच्या वाढदिवसानिमित्त मा.सौ.रजनीताई शिंगणे यांच्या वतीने दि.४ सप्टेंबर रोजी आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही द्वारा संचलित संत ज्ञानेश्वर निवासी अपंग व मूकबधिर विद्यालय दे.मही येथील दिव्यांग मुलांना व कर्मचारी यांना जेवण देवून अन्नदान करण्यात आले.या अन्नदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँगेस पार्टी दे.राजा महिला तालुका अध्यक्ष मंदाताई शिंगणे तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.रजनीताई शिंगणे या उपस्थित होत्या.प्रसंगी संस्थेच्या वतीने सौ.रजनीताई यांचा सत्कार शाल श्रीफळ देवून संस्थेचे सचिव श्री.सुनिल आरमाळ यांनी केला. या वेळी सौ.रजनीताई यांना दिव्यांग मुलांचे शिक्षण व संगोपन कशाप्रकारे केल्या जाते याची सविस्तर माहिती मुख्यध्यापिका कु.कुलकर्णी मॅडम यांनी दिली.यावेळी बोलतांना सौ रजनी शिंगणे यांनी सांगितले निराधारांना आधार देणे हाच खरा माणुसकी धर्म आहे,हा वाढदिवस निमीत्ताने गरजूंच्या मुखात अन्न जाण्यात मला आनंद आहे.

असे प्रतिपादन सौ रजनी शिंगणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शिक्षक श्री.गायकवाड यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शंकररावजी आरमाळ यांचा जीवनपट व दिव्यांग विद्यालयाची पार्श्वभूमीची माहिती दिली.या कार्यक्रमासाठी सौ.कल्पना ताई गावंडे,श्री. गजानन चेके (तालुका अध्यक्ष.युवक रा.काँ.पा.दे.राजा),श्री.गणेश नागरे (सरपंच बायगाव खुर्द),श्री अनिल शिंगणे,श्री.बळीराम शिंगणे,श्री.पंढरी डोके श्री.निखिल शिंगणे,श्री.वैभव टेकाळे,श्री.योगेश आरमाळ, श्री.आदिल पठाण (पत्रकार), मुख्यध्यापक श्री.झनक, कु.कुलकर्णी मॅडम, कु.वायाळ मॅडम,श्री.सुलताने,शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या वेळी सौ.रजनीताई यांनी मनोगतामध्ये सांगितले की दिव्यांग मुलांना जरी परमेश्वराने दिव्यांगत्व दिले असले तरी त्यांना सुद्धा इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे.अशी मुले सतत परिस्थितीशी संघर्ष करीत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असतात.

संस्था व विद्यालयाकडून त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्यासाठी हातभार लावण्याचे एक चांगले कार्य पार पडत आहे. सौ.रजनीताईनी संस्थेकडून दिव्यांग मुलांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधा व शालेय परिसराबद्दल समाधान व्यक्त करून दिव्यांग मुलांना अन्नदान करून मनाला अतिशय समाधान झाले तसेच या पुढे सुध्दा या दिव्यांग मुलांना सेवा देण्यासाठी वेळेत वेळ काढून विद्यालयात येण्याची भावना यावेळी रजनी शिंगणे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली यावेळी संस्थेचे उपस्थित कर्मचारी श्री.झनक, कु.कुलकर्णी मॅडम, कु.वायाळ मॅडम,श्री.गायकवाड,श्री. सुलताने,श्री.शेरे,श्री.मोहिते,श्री.कांबळे,श्री.लंबे,श्री. सानप,श्री.नागरे,श्री.बंगाळे श्री.राठोड,श्री.मांटे,श्री.बुरकुलश्री.आरमाळ,श्री.पडघान,श्री. मघाडे सौ.बंगाळे बाई , उदेपुरकर बाई,खरात बाई,श्री. रेशवाल.. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री.सुलताने सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये