ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा गायिका /अभिनेत्री प्रीत पाटील महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा तालुक्यांतील युवा गायिका अभिनेत्री प्रित पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ मुंबई येथे देऊन सन्मानित करण्यात आले.

 व्यासपीठावर अध्यक्ष नामदेव झिंगाडे, माँ साहेब जिजाऊ यांचे वडील लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव(सिंदखेड राजा)माजी नगरसेवक,विनोद शेलार यांचे सह इतर मान्यवर यांच्या उपस्थिती सत्कार समारंभ संपन्न झाला

 प्रीत यांची गायन क्षेत्रातील कामगिरी तसेच आपल्या दरवर्षी येणाऱ्या वाढदिवस निम्मित अन्नदान करणे तसेच गोर गरीब मुलांना शैक्षनिक साहित्य वाटप,महिला तरुण तरुणी साठी विविध स्पर्धा चे आयोजन करीत बक्षीस वितरण त्या करीत असतात

 मराठी भाषा चा वारसा जपत गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी त्यांनी घेतली आहे.

 बापाचा बाप येतोय( गौतमी पाटील सोबत) या गाण्याने सोशल मीडिया वरती धुमाकूळ घातलेला आहे.

तसेच सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे शाही घराणे यांच्या सोबत(तू माझी नवी रिंगटोन)गाणे गाऊन T~series वरती राढा केलेला आहे.

हिंदवी पाटील सोबत लावणी तसेच,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भीमाचे गाऊ किती गुणगान ,लघु चित्रफित,व्हिडिओ माध्यमातून प्रकाश टाकला आहे.

 माझी रमा ती स्वाभिमानी हे गीत स्वतः लिहून गायीले आहे.तसेच भिमगीत,रमाई गीत तसेच विविध कार्यक्रम गायनाच्या माध्यमातून त्या करीत आहे, त्यांना विविध सन्मान चिन्ह, पुरस्कार,सत्कार,प्रावीण्य संपादन अगदी कमी वयात केले आहे प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) यांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित केले, प्रीत पाटील यांना सन्मानित केल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये