Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी तर्फे तान्हा पोळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : रोटरी क्लब वरोरा व जयभारती गणेश मंडळ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जय भारतीय चौकात तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्ष म्हणुन रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष बंडूभाऊ देऊळकर हे होते.

 कार्यक्रमात रोटरी वरोरा सचिव अभिजीत मणियार, पदाधिकारी डॉ सागर वझे, डॉ. विवेक तेला दामोदर भासपाले, अमित नाहर, राम लोया, मनोज जोगी, योगेश डोंगरवार, पवन भुजाडे, हिरालाल बघेले, मनोज कोहळे,,होजफा अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

     अध्यक्षीय भाषणात बंडू देऊळकर म्हणाले की, तान्हा पोळा हा विदर्भाची खास ओळख आहे. लहान मुलांना बैलाचे व शेतीचे महत्व समजावे म्हणून नागपूरचे श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी या उत्सवाला सुरूवात केली होती. तेव्हापासून ही परंपरा वर्षांपासून कायम आहे. जय भारतीय चौकात मागील जवळपास ५० वर्षापासून तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. वरोरा रोटरी मागील २५ वर्षापासून जय भारतीय मंडळाच्या सहयोगाने हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे.

     यावेळी प्रमुख मान्यवरांनी ही तान्हा पोळ्याचे महत्व विषद केले.

   शहरातील जय भारती चौकात भरविण्यात आलेल्या तान्हापोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलाला घेऊन प्रचंड गर्दी केली होती. पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता त्यांना घेऊन आलेले पालक तसेच उपस्थित दर्शक म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या बैलाचे सजावट, वेशभूषा तसेच नंदीची प्रशंसा करीत होते. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा करून आलेले

 बालगोपालांच्या चिमुकल्यांच्या नंदीपासून तो मोठमोठ्या काष्ठ शिल्पाच्या अप्रतिम नमुना असलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

    उत्कृष्ट सजावट व वेशभूषा अव्वल ठरलेल्या पृथा लोहकरे , साक्षी वरुडकर ,अंश मुंदडा, वेदांशी बुरडकर यांना क्रमशः प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ पुरस्कार तथा उत्कर्ष जीवतोडे, तनुष जानवे, शिवाय पवार, आरोही लांडे, रिमांश नाशिककर, अद्विक तळोदीकर, दुर्वा लांडे, स्पर्श बोबडे, गोरांश नेवलकर यांना प्रोत्साहन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून हरिश्चंद्र ढोबळे व अधिवक्ता विद्या बुरान यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन रोटे. मनोज जोगी यांनी केले. आभार योगेश डोंगरवार यांनी मांनले. कार्यक्रमाला जय भारतीय मंडळाच पदाधिकारी सदस्य, परिसरातील महिला, पुरुष, बालगोपाल, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये