Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रॉयल बार बंदीसाठी पारडी वासियांचा चंद्रपुरात आक्रोश

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील पारडी येथे ग्रामपंचायतीच्या विना परवानगीने सुरु असलेले रॉयल बार अँड रेस्टॉरंट बंद करण्याच्या मागणीसाठी पारडी वासीय शेकडो महिलांनी चंद्रपूर येथे धडक दिली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत बार बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

सावली तालुक्यातील पारडी येथे महिलांच्या पुढाकारात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. पारडी ग्रामपंचायत हद्दीत कोणतेही परवाना असलेले देशी किंवा विदेशी दारू दुकान नव्हते. 2022 मध्ये ग्रामपंचायत ने नवीन बारसाठी आलेले अर्ज नाकारून नाहरकत दिले नाही. मात्र उत्पादन शुल्क विभागाने यांचा विचार न करता परवाना देऊन बार सुरु झाले. यामुळे याबाबत गावाकऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. विभागाने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तक्रारदारांच्या सह्यांची शहानिशा केली मात्र त्यानंतर kahich कारवाई न झाल्याने गावकरी संतप्त होऊन शेकडो महिला पुरुष चंद्रपुरात पोहचले. चंद्रपुरात शेकडो महिला पुरुष आल्याने पोलीस विभाग सतर्क झाली. त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांचेशी शिष्टमंडळाशी भेट घडवून आणत चर्चा केली. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचेशी शिष्टमंडळाने चर्चा केली. पोलीस अधिक्षक यांनी सावलीचे पोलीस निरीक्षक यांचेसोबत फोनवरून पारडी गावाकडे विशेष लक्ष देण्यास सूचना केली.

यावेळी पारडीचे उपसरपंच पारस नागापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष रवी गेडेकर, माजी सभापती छाया शेंडे, दारूबंदी अध्यक्ष सोनी नरुले, ग्रामपंचायत सदस्य नीता नरुले, ताराचंद नायबनकर, सुनील चौधरी, गणेश नरुले, अतुल नागापुरे, हेमचंद वाघरे, मंदाबाई गेडेकर, विमलबाई जराते, माधुरी जराते सह शेकडो महिला पुरुष सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये