ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तान्हा पोळाच्या दिवशी बुरड मोहल्ला वर्धा येथे लाखोचा दारूसाठा जप्त

वर्धा उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 03.09.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना गोपनिय माहीती वरून बुरड मोहल्ला, इतवारा बजार वर्षा येथे आरोपी नामे वि.स.बा. वय 16 वर्ष रा. बुरड मोहल्ला इतवारा बजार वर्षा यांचेवर प्रोव्हीशन रेड केला असता शाहरूख बेग रा. बुरड मोहल्ला इतवारा बजार वर्धा याची किरायानी केलेली खोली मध्ये दोन फिज मध्ये बियर व बार सारख्या 31 प्रकाराच्या दारूचा माल मिळुन आला 1) दोन एल.जी कंपनीची फिज अंदाजे की. 30,000/-रू 2) वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारू व बियर दारूचे एकुन दारू कि. 233,400 रू एक जुना वापरता रियलमी कंपनीचा मोबाईल अंदाजे की. 10,000/- रू असा एकुन जु.की. 273,400 रू चा अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

सदर विदेशी दारूचा माल हा कोणाचा आहे व कोणी आनुन दिला या बाबत विचारपुस केली असता वि.स. बालक यांनी सांगीतले की सदरचा विदेशी दारूचा माल हा शाहरूख बेग व जाहीद पठान दोन्ही रा. बुरड मोहल्ला इतवारा बजार वर्धा यांचा मालकीचा असुन मी त्याचे कडे 300 रू रोजानी नौकर आहे मी त्यांचा ग्राहक यांना विदेशी दारूचा माल नेवुन देत असतो तसेच सदर मिळुन आलेली विदेशी दारूचा माल हा मुकेश जयस्वाल रा. पुलगांव यांनी आणुन दिला आहे.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरुध्द 1) अपराध क्रमांक 1404/2024 कलम 65 ई. 77 अ. 83, म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये