ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीसांतर्फे नागरीकांना वाहतुकी संदर्भात आवाहन

मागील 5 वर्षामध्ये वर्धा जिल्हयात एकुण 1039 अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, मागील 5 वर्षामध्ये वर्धा जिल्हयात एकुण 1039 अपघात झाले असुन त्यामध्ये मोटर सायकल चालवितांना बिना हेल्मेट घातल्याने, चारचाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट न लावल्याने तसेच दारु पिवून वाहन चालवितांना डोक्याला व शरीराला मार लागून 431 इसम मृत्युमुखी पडलेले आहे. त्यामुळे मोटर सायकल चालवितांना हेल्मेट घालणे, चारचाकी चालवितांना सिट बेल्ट लावण, तसेच दारु पिवून वाहन न चालविणे अनिवार्य असुन त्याबाबत वर्धा जिल्हयांमध्ये बिना हेल्मेट मोटर सायकल चाजवितांना विना सिटबेल्ट चारचाकी वाहन चालवितांना तसेच, दारु पिवुन वाहन चालवितांना आढळुन आल्यास अशा चालकांवर विशेष मोहिम राबवून मोटर वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच वर्धा शहरात वाहतुकीच्या वर्दळीच्या ठिकाणी वाहने उभी करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यावर वाहतुकीच्या ठिकाणी, तसेच नो पार्कींगच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास सदर वाहने (टोईंग व्हॅनव्दारे ) उचलून अशा वाहन चालकांवर मोटर वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरीकांनी हेल्मेट घालूनच मोटर सायकल चालवावी, सिट बेल्ट लावूनच चारचाकी वाहन चालवावे. तसेच दारु पिवून वाहन चालवू नये. तसेच रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी नो पार्किंगचे ठिकाणी वाहने उभी करु नये. याची नोंद घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये