Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महायुती सरकार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी झटणारे! – देवराव भोंगळे

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कोरपन्यात सामुहिक रक्षाबंधन व महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

ज्या धोरणात्मक निर्णयांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होईल अशी कल्याणकारी कामे आपले महायुतीचे राज्य सरकार करत आहे. हे राज्य सरकार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी झटणारे, झिजणारे सरकार आहे. म्हणूनच आगामी काळात आपले आशिर्वाद महायुतीच्या पाठीशी असूद्या, जेणेकरून पुढील पाच वर्षे नवनवीन योजनांच्या माध्यमातून तुमच्या सेवेची संधी आम्हाला मिळेल. अशी भावना आयोजक तथा भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.

भाजपा महिला मोर्चा कोरपना तालुका तसेच मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय कोरपना च्या वतीने काल (दि. ३१) आयोजित केलेल्या सामुहिक रक्षाबंधन व महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते.

शहरातील जुन्या आय.टी.आय जवळील सेवा केंद्रात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणून महिलाभगीनींना आर्थिक सहयोग करण्याचे काम केले आहे. राज्यातील एकही महिला विकासापासून वंचित राहायला नको, ती स्वयंपूर्ण आणि सशक्त व्हावी असाच सरकारचा मानस आहे. त्यामुळे तुम्ही बांधलेल्या राखीच्या साक्षीने सांगतो, तुमच्या उन्नतीसाठी, या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सर्व समाजघटकांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास ही त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांना दिला.

या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, तालुका महामंत्री विजय रणदिवे, प्रमोद कोडापे, रमेश पा. मालेकर, किशोर बावणे, हरबाजी झाडे, दिनेश खडसे, नैनैश आत्राम, ज्योत्सनाताई वैरागडे, अल्काताई रणदिवे, जयाताई धारणकर, अनुताई ताजणे, गिताताई डोहे, वर्षाताई लांडगे, इंदिराताई कोल्हे, अरविंद तिरणकर, संतोष जोगी, लोडबाजी इंगळे, नारायण मडावी, चंद्रभान पेल्लोरे, उमेश पालीवाल आदींसह महिलांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये