Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

पारंपरिक पद्धतीने बंजारा समाजाने साजरा केला तीज महोत्सव

जवारा विसर्जनाने झाली बारा दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बंजारा समाज आपल्या विविधरंगी परंपरेसाठी ओळखल्या जातो. विदर्भ मराठवाडा सीमेवर मूळ वस्ती असलेल्या बंजारा समाजाची राजुरा तालुक्यातही मोठी संख्या असुन आधुनिक काळात आजही ह्या समाजाच्या लोकांनी आपली सांस्कृतिक ओळख टिकवुन ठेवली असुन जगाच्या पाठीवर कुठेही असले तरीही ह्या समाजातील नागरिक प्रयत्नरत असतात.

दरवर्षी बंजारा समाजात तिज साजरी करीत असतात त्याच अनुषंगाने यंदा देखिल समाजातल्या थोरमोठ्यांनी दिनांक 19 ते 31 ऑगस्ट दरम्यान बंजारा समाज भवन बामनवाडा (राजुरा) येथे तिज महोत्सव पारंपरिक पद्धरीने साजरा करण्यात आला. तिज महोत्सवात रोज सायंकाळी समाजातील नागरिकांनी एकत्रितपणे पारंपरिक नृत्य, प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच लहान मुलाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

शेवटच्या दिवशी समाजातील पुरुष, महिला आणि मुलींनी आपल्या समाजाच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून, डफडा च्या तालावर गितगायन, नृत्य करीत आनंद साजरा करीत समाज भवन बामनवाडा पासून राजुरा शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढत तिज (जवारा) चे विसर्जन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायक प्रकाश जाधव, कारभारी प्रभाकर चव्हाण, डाव हरिश्चंद्र राठोड, एन. डी. जाधव, गणपत चव्हाण, अंबादास राठोड राजेश्वर चव्हाण, संतोष जाधव, बळी आडे, तिरुपती जाधव, नामदेव जाधव, अनिल राठोड, दत्ता चव्हाण, भारत चव्हान, संदीप आडे, माधव राठोड, विजय राठोड गोपाल राठोड, भारत राठोड, अंकुश राठोड, दत्ता जाधव, रेश्मा चव्हाण, शिला जाधव आणि समाजातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये