Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहंमद पैगंबर बद्दल विवाद ग्रस्त व्यक्तव्य करणारे रामगिरी महाराजा ना अटक करा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

    मुस्लिम धर्माचे धर्मगुरू संस्थापक मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाबद्दल विवाहग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांना अटक करा या मागणीसाठी कोरपना येथे मौलाना शेरखान रजवी यांच्या नेतृत्वातशेकडो मुस्लिमांनी जामा मस्जिद चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत निदर्शने व घोषणा देत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कोरपना येथीलमुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने धरणे निदर्शनामध्ये सहभागी झाले होते रामगिरी महाराज यांनी धर्मगुरू यांच्या बद्दल केलेले अपशब्द व विवाद ग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा संतोष उफाळून आला आहे.

महंमद पैगंबर बद्दल मुस्लिम समाज अपमान सहन करणार नाही रामगिरी महाराज यांनी धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं व अपमान जनक शब्दाचा वापर करून इस्लाम धर्मियांना कमी लेखण्याचा व भावना दुखवण्याचा बयानबाजी करून विवाद निर्माण केला आहे राज्यकर्ते देखील सर्वधर्मसमभाव हे भूमिका पार न पाडता विवाद ग्रस्त रामगिरीमहाराजाला धक्का लागू देणार नाही अशा प्रकारचे शब्द वापरून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणाऱ्या नेत्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला मुस्लिम समाजांनी शांततेने निदर्शने देत कोरपना पोलीस स्टेशन येथे ठाणेदार केकण यांच्याकडे तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व शासनाने राज्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती व मोहम्मद पैगंबर याबद्दल केलेले वक्तव्य राज्यभर याचे पडसाद उमटू लागले आहे.

शासनाने याची दखल घेऊन रामगिरी महाराज यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली यावेळी कोरपणा शहरातील तमाम समाज बांधव रस्त्यावर उतरले होते शांततेत रॅली काढून पोलीस स्टेशन समोर निदर्शने करण्यात आली व याबाबतची तक्रार मौलाना शेरखान आबिद अली मोहम्मद रफीक अब्दुल सत्तार अब्दुल वाहब मजीद कमिटीचे अध्यक्ष असरार अली यांनी दाखल केली रॅलीमध्ये मोबीन बेग शौकत अली अल्ताफ बेग सुहेल अली शहेबाज अली शब्बीर शेख मजीद शेख मोहब्बत खान नदीम अली रिजवान शकील सलीम पारेख मोहमद नगरसेवक शमशुद्दीन महेमूद रऊफ शेख जबार मामु इसराईल रमजान शेख यांचे सह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये