Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“माईंड यूवर माईंड” कार्यक्रमाच्या माध्यमातून देवयानी शिरखेडकर यांनी दिला निरोगी शरीर ठेवण्याचा मंत्र

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने नागपूर येथील देवी फिटनेस स्टुडीओ आणि देवीज ट्रेनिंगच्या संचालिका तथा प्रसिध्द योगा आणि सॉफ्ट स्कील ट्रेनर श्रीमती देवयानी शिरखेडकर यांच्या “माईंड यूवर माईंड“ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीमती शिरखेडकर यांनी निरोगी शरिराकरीता राखावयाची विविध सुत्र कशी जपावी व आपले शारीरीक स्वास्थ निरोगी कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन् केले.

सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात श्रीमती देवयानी शिरखेडकर यांनी रोजच्या धकाधकीच्या जिवनात पदोपदी अनेक प्रसंग येतात व त्यामुळे मुनुष्याच्या बुद्धीवर मानसिक ताण येतो. त्यामुळे साहजिकच मनुष्याची मानसीक स्थिती बदलते त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील कामावर होतो. अश्यावेळी आपण आपल्या रागावर, मनावर कसा ताबा ठेवायचा प्रयत्न करायचा ह्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या समजून सांगीतल्या. श्रीमती शिरखेडकर यांनी याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांकडून काही प्रात्याक्षिक देखील करवून घेतले तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवार यांनी केले.

कार्यक्रमाचा सुविचार मनिषा पडगीलवार हिने पठन केला. या कार्यक्रमाला रोटरीचे माजी अध्यक्ष विजय आईंचवार, मधुसुदन रुंगठा, रविंद्र जैन, प्रदीप बुक्कावार, अरुण तिखे, डॉ अशोक वासलवार, अनुपकुमार यादव, डॉ.बालमुकूंद पालिवाल, कुंजबिहारी परमार, स्मिता जीवतोडे, वृषाली डेकाटे, राजश्री मार्कंडेवार, डॉ. सिमला गाजरलावार, अविनाश उत्तरवार, संदिप रामटेके, मनिष बोराडे तसेच रोटरीचे विविध पदाधिकारी व सदस्य व नागपूर रोटरीचे माजी अध्यक्ष विवेक गारगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मिलींद बोडखे केले. सदर कार्यक्रमाला उपस्थित सर्व सदस्यांनी वरिल व्याखानाचा विशेष लाभ घेतला व पुढील वाटचालीत त्याचा उपयोग करून मानसीक तणावातून मुक्त होण्याचा मानस केला असे संस्थेचे सचिव कळवितात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये