Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरीकांचे हरविलेले २२२ मोबाईल वर्धा सायबरने शोधुन त्यांचे मुळ मालकांना केले परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे तसेच अनेकवेळा मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांची हिरमोड होते. अशा नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची योजना मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी आखली व सदरची जबाबदारी वर्धा सायबर यांना देण्यात आली होती. त्यावरुन वर्धा सायबर पथकाने दैनंदिन कामकाज सांभाळुन हरविलेल्या मोबाईलचे शोध घेण्याचे आदेश प्राप्त होताच मोबाईल फोनचे शोध कार्य सुरु केले. चालु वर्षात एकुण ५६८ मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी प्राप्त असुन सदर शोध मोहिम दरम्यान वर्धा जिल्ह्यातुन, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन तसेच बाहेरील राज्यातुन असे एकुण २२२ मोबाईल कि. ३३,२९,५०० रु. चे हस्तगत करण्यात आले.

दिनांक २९.०८.२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशाप्रमाणे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हे त्यांचे मुळ मालकांना परत करणेकरीता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी वर्धा श्री. राहुल कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला असुन सदर कार्यक्रमाकरीता १३४ नागरीक उपस्थित झाल्याने नागरीकांचे तक्रारीची खात्री करुन त्यांना त्यांचे मोबाईल सुपुर्त करण्यात आले. तसेच उर्वरीत मोबाईल त्यांचे मुळ मालकांना सायबर सेल, वर्धा येथुन सुपुर्त करण्यात येत आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक़ डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल चव्हाण (भा.पो.से.), श्री. प्रमोद मकेश्वर, श्री. देवराव खंडेराव, श्री. रोशन पंडीत यांचे निर्देशाप्रमाणे पो.नि. विनोद चौधरी स्था.गु.शा. वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सायबर सेल, वर्धा येथील पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, मिना कौरथी, विशाल मडावी, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अंकित जिभे, प्रतिक वांदीले यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये